संस्थापन

समाजातील दुर्बळ घटकांच्या आर्थिक उद्धारासाठी सहकार्याच्या भावनेने आणि सहकारी तत्वाच्या माध्यमातून दि. कुरुंदवाड को. ऑप. बँक लि. कुरुंदवाड या बँकेची स्थापना दि. १२/०८/१९५६ चैत्र पाडव्या दिवशी झाली.

बँक स्थापनेवेळी आर्थिक परिस्थिती

सभासद संख्या (प्रमोटर्स) भाग भांडवल ठेवी कर्जे
४१ रु. २०,०००/- रु. २६,०३९.१३ / - रु. १७,७९० / -

बँक स्थापन होण्याआधी बँकेच्या अस्तित्वाविषयी लोकात असलेले गैरसमज, भीती बँकेने पहिल्याच वर्षी नफा घेवून सभासदांना लाभांश देवून दूर केली. बँकेने आपल्या स्थैर्याच्या दृष्टीने बँक कार्यालयासाठी बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी इमारत दुसऱ्याच वर्षी घेतली. इतक्या कमी कालावधीत स्वतःची इमारत होणे फारच थोड्या सहकारी बँकांना शक्य झाले आहे.
कुरुंदवाड व शिरोळ तालुक्यातील गोरगरीब सामान्य जनांचा आर्थिक विकास करण्याचे ध्येय घेवून आज आपल्या बँकेने जनमानसात विश्वासाचे स्थान प्राप्त केले आहे हे पुढील आकडेवारी वरून दिसून येईल.
(आकडे लाखात)

तपशील सभासद भाग भांडवल निधी ठेवी कर्जे नफा खेळते भांडवल
१९५६ ४१ ०.२० - ०.२८ ०.१८ ०.०१ ०.१४
१९६१ १५१ ०.४३ ०.१२ २.६२ १.४९ ०.१० ३.३०
१९७१ १७५ १.०० ०.९९ १०.७६ ६.९७ ०.२० १३.८०
१९८१ १५९७ ६.९७ ८.०३ १०४.२१ ६३.१८ २.२८ १२३.८३
१९९१ ७९५९ ३२.०० १०२.४४ ६४८.३१ ५७५.५० २०. ०१ ८२३.४९
२००१ १४,१७९ ६८.०६ ४२४.३२ १६५०.५१ १३६५. ७५ ६२.७८ २४८८.५८
२०११ १६५८० २२०.३७ १०५६.०२ ७०६९.२७ ४१२५.३६ ३१.५६ ८३६१.७०
२०२१ २४०३५ ९१२.५१ २९०१.६३ २६४१९.२२ १४१७३.१५ १५९.२० ३००४०.१६

महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० च्या तरतुदी व बँकिंग रेग्युलेशन अक्ट १९४९ च्या तरतुदीनुसार बँकेत बँकिंगचे सर्व व्यवहार केले जातात. सध्या आपल्या बँकेच्या प्रधान कार्यालयासह १९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी उत्तम व्यवसाय करीत असल्याचे खालील आकडेवारी वरून दिसून येईल (दि. ३१-०३-२०२३) (आकडे लाखात)

शाखा स्थापना ठेवी कर्जे नफा
मुख्य शाखा कुरुंदवाड १२-०४-१९५६ ७०२५.१३ ४८७१.६६ २११.९८
शाखा शिरढोण १३-०२-१९७८ १५८९,८१ ५०३.२२ ३३.९२
शाखा आलास १४-१०-१९७९ १७६९.४९ ५४३.०८ ४२.४२
शाखा खिद्रापूर ०१-१०-१९७९ १४०८.३६ ९०३.१२ ४८.०९
शाखा जयसिंगपूर १७-०६-१९८४ ३७०३.४४ १७०९.९४ १२१.१९
शाखा दानोळी १०-०१-१९८८ २२२०.६८ १२७०.१२ ७९.५६
शाखा सांगली ०१-०८-२०१० २८११.४३ १३९८.६४ ७३.१३
शाखा कुपवाड एमआयडीसी २४-१०-२०१२ १४०२.०६ १२६५.४८ ५९.२७
शाखा चिंचवाड १६-१२-२०१३ १००५.९६ ४५१.१० १३.७१
शाखा आष्टा २०-०२-२०१४ २२०५.९६ ८३७.७४ ९४.५८
शाखा वसगडे २७-०८-२०१४ १०७२.५१ ४५३.९७ १८.७६
शाखा कवठेएकंद ११.०१.२०१६ ६३३.२२ ६६६.४९ २२.४३
शाखा गणेशवाडी १७.०२.२०१६ ६६७.७२ ७५६.५६ २६.९०
शाखा कोल्हापूर १८.१०.२०१६ १०३७.८६ १००१.४४ २५.३०
शाखा हातकणंगले १६.११.२०१६ ९९३.८२ ८०४.६१ ३०.७९
शाखा पेठ वडगांव ०२.०५.२०१७ ७०६.४९ ४२९.३१ ६.१३
शाखा पंचमुखी सांगली ०३.०१.२०१९ ८२६.९६ ४५५.६१ ५.१२
शाखा मालगांव १२-१२-२०२२ १९१.०३ १०१.३८ ७.९५ (तोटा)

सामान्य जनमाणसांचे प्रतिनिधित्व करणारे प्रामाणिक संचालक विश्वस्ताप्रमाणे निरपेक्ष वृत्तीने कार्य करीत असल्याने एकदा अपवाद वगळल्यास या बँकेची निवडणूक नेहमी बिनविरोध झाली आहे. हे या बँकेचे आणखी एक वैशिष्ट म्हणता येईल. बँकांच्या कारभारात पारदर्शकता आणणेसाठी सन १९९३ मध्ये नरसिंहिय्या कमिटीच्या शिफारसी रिजर्व्ह बँकांना लागू केलेल्या आहेत. एन. पी. ए. शिफारसींच्या अंमलबजावणीमुळे बँकेच्या कारभाराचे वास्तव दर्शन सभासदांना होणार आहे. एन. पी. ए. अंमलबजावणीमुळे अनेक बँकावर परिणाम होऊन त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना आमच्या बँकेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. याचे कारण म्हणजे आपल्या बँकेने सुरुवातीपासूनच आपला कारभार स्वच्छ, कार्यक्षम व काटकसरीने करून मोठ्या प्रमाणात निधी उभा केला आहे. त्यामुळे एन. पी. ए. शिफारसींचा बँकेवर कोणताही अनिष्ठ परिणाम झालेला नाही. यासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने योग्य ती कार्यपद्धती आणली असून बँकेने नियमित, अनियमित थककर्जाचे बाबतीत संशयित बुडीत कर्जाची योग्य पद्धतीने तरतुदी केलेल्या आहेत. बँक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. कुरुंदवाड व परिसराच्या सामाजिक जडणघडीत विकासात बँकेचा सिहांचा वाटा आहे. बँकेने आतापर्यंत आयुर्वेदिक आरोग्य शिबीर, लोकन्यायालय, बँकेचे कार्यक्षेत्रातील शेतकरी व सभासद यांना मार्गदर्शनपर रेशीम व ऊस उत्पादनाबाबतची शिबिरे आयोजित केली आहेत.